माझं अजून वय झालेल नाही, अजून राजकारण बाकी आहे - शरद पवार

मिलिंद संगई
Sunday, 21 April 2019

तुम्हाला मी काय म्हातारा झालो असं वाटतंय का? असा सवाल करत एक मोदी नाही अशा कितीतरी मोदीना अजून आपल्याला कामाला लावायचे आहे, असे सांगत शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला.

बारामती: माझं अजून वय झालेलं नाही आणि या वयातही मी फिरतो कष्ट करतो असं कुणी मला म्हटलं तर त्याचं माझं भांडण होईल. तुम्हाला मी काय म्हातारा झालो असं वाटतंय का? असा सवाल करत एक मोदी नाही अशा कितीतरी मोदीना अजून आपल्याला कामाला लावायचे आहे, असे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला.

सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेचा शेवट करताना आज शरद पवार यांनी आजही आपलं वय झालेलं नाही आणि अजूनही आपल्याला राजकारणात बरीच मोठी कामे करायचे आहेत असा संदेश राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला.

मी म्हातारा झालो नाही, असा सूचक इशारा देत शरद पवार यांनी मोदींना कामाला लावण्याचा संदेश आपल्या भाषणातून देत सुप्रिया सुळे यांना विक्रमी मताधिक्‍याने विजयी करा असा नेहमीचा खास शैलीतील शेवटच्या सभेचा सूचक संदेश बारामतीच्या मतदारांपर्यंत पोहोचवला अशी या सभेनंतर बारामतीच्या राजकीय वर्तुळात चर्चा होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar targets Narendra Modi in baramati Rally