Election Result : कोण होईल पुण्याचा खासदार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहन जोशी यांच्यातील दुरंगी लढतीत कोण विजयी ठरणार हे पाहण्यासाठी मतदान केंद्रावर पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. 
 

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहन जोशी यांच्यातील दुरंगी लढतीत कोण विजयी ठरणार हे पाहण्यासाठी मतदान केंद्रावर पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. 

या निवडणुकीत बापट विजयी झाल्यास पुण्याच्या राजकीय इतिहासातील भाजपचा हा पहिलाच सलग विजय नोंदला जाईल. यापूर्वी अण्णा जोशी आणि त्यानंतर प्रदीप रावत भाजपच्या तिकिटावर पुण्यातून निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत खासदार अनिल शिरोळे यांना पुणेकरांनी निवडून दिले होते. त्यामुळे भाजपच्या पहिल्या सलग विजयाची मुहूर्तमेढ बापट पुण्यात उभारणार का याबाबत पुणेकरांमध्ये सकाळपासूनच चर्चा रंगत आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रित बळ यावेळेला जोशी यांच्या मागे उभे केले आहे. त्यामुळे काँग्रेसचा एक बालेकिल्ला असलेला पुणे लोकसभा मतदारसंघावर पुन्हा पंजाचे निशाण ओळखले जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली. फेरीच्या निकालाची वाट पाहत पक्ष कार्यकर्ते मतमोजणी केंद्राच्या बाहेर उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे चित्र दिसत आहे. पक्षाचे निशाण असलेले झेंडे या परिसरात फडकत आहेत. 

पुण्याचे मतदान बरोबर एक महिन्यापूर्वी झाले. जेमतेम 49.54 टक्के पुणेकर मतदानासाठी घराबाहेर पडले होते. या पुणेकरांनी नेमके कोणाच्या पारड्यामध्ये किती मते टाकले याची मोजणी सध्या केंद्रावर सुरू आहे. आपण दिलेल्या उमेदवाराला किती मते पडत आहेत हे पाहण्यासाठी ही पुणेकर नागरिकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली आहे. पक्ष कार्यकर्ते आणि उत्साही नागरिक यांना वेळीच रोखून कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही मतदान केंद्राबाहेर ठेवण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who will be the MP of Pune?