अंदाजपंचे: पुण्यात बापटांची बाजी, तर औरंगाबाद, जालन्यात असे होईल !

बुधवार, 15 मे 2019

जालन्यात पुन्हा दानवेच!
पुण्यात बापट मारणार बाजी...
औरंगाबादेत खान, बाण अन् ट्रॅक्टरचा फॅक्टर हाताला मात्र आधार नाही

निवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच चौथ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न.

पुण्यात बापट मारणार बाजी...
पुण्यात पहिल्यापासूनच भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. पण पुण्यात राज्यातील सगळ्यात कमी 53 टक्के मतदान झाले. कमी मतदान झाले असल्यामुळे भाजप आणि गिरीश बापट यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात असली तरी, पण भाजपला मानणाऱ्या भागात मतदान वाढले, ही बापटांची जमेची बाजू आहे. फक्त थोडीफार लीड कमी होईल असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. गेल्यावेळी भाजपचे अनिल शिरोळे तीन लाख मतांनी निवडून आले होते. शेवटच्या टप्प्यात मोहन जोशी यांनीही जोरदार प्रचार केला, पण गिरीश बापट हेच पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी होतील हे नक्की आहे.

औरंगाबादेत खान, बाण अन् ट्रॅक्टरचा फॅक्टर हाताला मात्र आधार नाही
औरंगाबादमध्ये चार उमेदवार मैदानात असल्यामुळे मतदानाची ही टक्केवारी वाढून 65 टक्क्यांवर गेलीय. मतदानाची टक्केवारी वाढल्याने सलग चारवेळा निवडून आलेल्या चंद्रकांत खैरे यांची सीट धोक्यात आली असल्याचे म्हटले जात असले तरी त्यांनी शेवटच्या टप्प्यात बाजी मारलेली दिसून आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जावई हर्षवर्धन जाधव यांचा ट्रॅक्टरचा फॅक्टर जोरात चालला. तर, काँग्रेसच्या हाताला मात्र कोणाचाच आधार मिळालेला दिसला नाही. दुसरीकडे एमआयएमचा पतंग जोरात होता. आतापर्यंत खान आणि बाणच्या प्रचाराचा नेमका नेम लागत नसल्याने खैरे यांच्या चिंता वाढल्या आहेत. पण मतदानाच्या दिवशी पुन्हा खान आणि बाणाचा प्रचार चालताना दिसला. पण नेमकं कोण जिंकणार याचा अंदाज मात्र मतदारांनी कुणालाही लागू दिलेला नसला तरी शेवटी खैरी बाजी मारणार हे निश्चित आहे.

जालन्यात पुन्हा दानवेच!
सलग चारवेळा जिंकून येणाऱ्या दानवेंना यावेळी वैयक्तिक तसंच सरकारविरोधी नाराजीचा सामना करावा लागला. औरंगाबादमधे भाजपमधल्या काहींनी उघडपणे दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी काम केलं. सिल्लोडमधे आमदार अब्दुल सत्तार यांनी अप्रत्यक्षपणे दानवेंना पाठिंबा दिला. दुसरीकडे औताडे यांच्यासाठी कोणी जास्त सक्रीय दिसले नाही. तरीही गेल्यावेळी मोदीलाटेत सहज शक्य झालेला विजय यंदा मात्र कागदावर दिसतो तेवढा सोपा नाही. पण, विजय दानवेंचाच होणार असला तरी लिड कमी होणे ही दानवेंसाठी धोक्याची घंटा आहे.

Web Title: Loksabha 2019 result prediction of Aurangabad pune and jalna Losksabha constituency