अंदाजपंचे : शिरूर, मावळ, बारामतीवर राष्ट्रवादीचाच फडकणार झेंडा!

शनिवार, 11 मे 2019

29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत.

29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत.

शिरूरमध्ये कोल्हे इतिहास घडवणार
शिरुर लोकसभा मतदारसंघात तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी तगडे आव्हान निर्माण केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आढळराव हे 301,814 अशा मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे यावेळी लिड कमी होईल पण आढळरावच निवडून येतील अशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना खात्री वाटते. तर कोल्हे यांच्या लोकप्रियतेचा फायदा होईल आणि यंदा शिवसेनेला धक्का बसेल असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आढळरावांच्या स्वत:च्या आंबेगांव तालुक्यात यावेळी सर्वात जास्त मतदान झाले आहे. इथे दिलीप वळसे यांची भूमिका निर्णायकी ठरेल. तसेच शहरी भागात वाढलेला मतदानाचा टक्का महत्वाचा वाटतो. त्यामुळे पारडे कोल्हे यांच्या बाजूने झुकलेले वाटते. मतदारसंघात आढळराव यांच्या विरोधात असलेली नाराजी पाहता आणि अमोल कोल्हेंचा नवा चेहरा लक्षात घेता, अमोल कोल्हे यांचा विजय निश्चित आहे.

पार्थवरील विश्वास मावळमध्ये सार्थ ठरणार
मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यात थेट लढत झाली. सुरवातीच्या काळात श्रीरंग बारणे हे आघाडीवर होते, परंतु 23 एप्रिलला राज्यात तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांनी मावळ मतदारसंघात प्रचार करून पार्थ यांना बळ दिले. सोबतच, चिंचवड आणि उरण विधानसभा मतदारसंघात झालेले अधिकचे मतदान राष्ट्रवादीला बळ देईल असे बोलेले जात आहे. पार्थ यांना पवार कुटुंबावरील राग-रोषाचा परिणाम निकालात जाणवणार हे नक्की. तरी पार्थ यांचाच विजय होईल हे नक्की !

बारामतीत पुन्हा घड्याळच...
मोदीलाटेतही 60 हजार मतांनी निवडून आलेल्या सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने आपली ताकद यावेळी पणाला लावली. गेल्यावेळी लीड कमी झाल्याने यंदा सुरवातीपासूनच सुळे यांनी कामाला सुरुवात केली होती. त्यामुळे प्रचारात त्यांनी आघाडी घेतली होती. मात्र कुल यांनी जोरदार लढत दिली. भाजपने सर्व शक्ती या मतदारसंघात पणाला लावली. त्यामुळे यावेळेसही मोठ्या लीडचं सुप्रिया सुळेंचं स्वप्न पूर्ण होणार नाही हेच दिसतंय. भाजपसाठी अनुकूल असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात झालेले अधिक मतदान हा चर्चेचा विषय आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP will win in all maval shirur and Baramati loksabha constituency