Election Results : उत्तर महाराष्ट्रात भाजपची मुसंडी; काँग्रेसची दाणादाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांवर  मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप पाच, तर काँग्रेस दोन जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.

लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे हेमंत गोडसे हे 8586 मतांनी पहिल्या फेरीत आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ दुसऱ्या तर अपक्ष माणिक कोकाटे तिसऱ्या स्थानावर आहे. विधानसभा निहाय पहिली फेरीचा निकाल मध्य- भुजबळ 1762, गोडसे 6316, कोकाटे 378. पूर्व भुजबळ 2004, गोडसे 5559, कोकाटे 339, पश्चिम भुजबळ 1535, गोडसे 4893, कोकाटे 289, सिन्नर- भुजबळ 2283, गोडसे 2211, कोकाटे 4680. देवळाली- भुजबळ 4496, गोडसे 4188, कोकाटे 636, इगतपुरी- भुजबळ 4338 गोडसे 1858, कोकाटे 896. एकूण- भुजबळ 16420, गोडसे 25005, कोकाटे 7218.

--------------

दिंडोरी लोकसभा
2nd round
नांदगाव विधानसभा मतदारसंघ
भाजप डॉ भारती पवार Pawar-7130 मते
राष्ट्रवादी धनराज महाले905
जे,पी.गावीत-5308

रावेर लोकसभा मतदार संघ अपडेट* 
------

भाजप आघाडीवर

रक्षा खडसे (भाजप)84911 आघाडी 

उल्हास पाटील (कांग्रेस)  48073

----------------

लोकसभा निकाल 2019 : नाशिक : अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांवर  मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप पाच, तर काँग्रेस दोन जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता.

उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 8 जागांसाठी मतदान झाले. भाजप, काँग्रेससह महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला एक जागा मिळण्याचा एक्झिट पोलचा अंदाज होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Shiv Sena leading in North Maharashtra for Lok Sabha 2019