Loksabha 2019 : मी त्यांचा बाप आहे : एकनाथ खडसे (व्हिडिओ)

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 एप्रिल 2019

- मी विरोधकांचा बाप आहे
- पहिले त्यांना पोहचवेन
- जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे खडसे यांची झाली प्रचार सभा

बादवड (जळगाव) : विरोधकांना वाटलं होतं, की एकनाथ खडसे रुग्णालयातून परत येणारच नाही. मात्र, मी त्यांचा बाप आहे, त्यांना पहिले पोहचवेन, असा टोला खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील सभेत मारला. 

युतीच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या युतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. रक्षा खडसे यांच्याविरोधात काँग्रेसने उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

खडसे म्हणाले, की विरोधक म्हणायचे आता नाथाभाऊ प्रचारात येत नाही, आता नाथाभाऊ काही रुग्णालयातून परत येत नाही. पण त्यांना मी सांगितले की, मी तुमचा बाप आहे. तुम्हाला पहिले पोहचवेन. मी कच्चा नाही तुमच्यासमोर रबरासारखा पुढे आलो की नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना केला. तुमच्या आशीर्वादाने नाथाभाऊ असाच उभा असेल.

Web Title: Eknath Khadse Critcise on Opposition Leader in Public Meeting