Dhule Loksabha 2019 : सायंकाळी सातपर्यंत 55.71 टक्के मतदान

Monday, 29 April 2019

धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कुणाल रोहिदास पाटील आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्यात प्रमुख लढत होत आहे.

धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कुणाल रोहिदास पाटील आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. आज या निवडणुकीसाठी शहरात उत्साहात मतदानाला प्रारंभ झाला.

सकाळी सातपासून या मतदानाला सुरवात झाली असून, सायंकाळी सातपर्यंत 55.71 टक्के सरासरी मतदानाची नोंद झाली. या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे (सायंकाळी सातपर्यंत)

- धुळे ग्रामीण : 58.20
- धुळे शहर : 52.00
- सिंडखेड : 56.37
- मालेगाव सेंट्रल : 47.50
- मालेगाव आऊटर : 56.82
- बागलाण : 63.00

अंतिम आकडेवारी अधिकृतरित्या अजून जाहीर झालेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kunal Patil and Subhash Bhamre Fight for election in Dhule