Loksabha 2019 : जळगावातही भाजपमधील वाद उघड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

शिवसेना - भाजप युती व इतर मित्रपक्ष या निवडणुकीला सामोरे जात असले तरी, रावेर लोकसभा मतदारसंघात शिवसेना प्रचारापासून दूर आहे. दुसरीकडे जळगाव भाजपमधील अंतर्गत वादांचा परिणाम प्रचारात दिसून येत आहे.

जळगाव - शिवसेना - भाजप युती व इतर मित्रपक्ष या निवडणुकीला सामोरे जात असले तरी, रावेर लोकसभा मतदारसंघात शिवसेना प्रचारापासून दूर आहे. दुसरीकडे जळगाव भाजपमधील अंतर्गत वादांचा परिणाम प्रचारात दिसून येत आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व अमळनेर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्यात झालेल्या हाणामारीनंतर जिल्हाध्यक्ष वाघ हे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात फारसे दिसत नसल्याची स्थिती आहे. वाघ यांची पत्नी आमदार स्मिता वाघ या जळगाव लोकसभा मतदारसंघात प्रचारात सक्रिय आहेत. मंगळवारी (ता.16) भुसावळात झालेल्या महायुतीच्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिती दिली. या सभेतही उदय वाघ उपस्थित नव्हते. तसेच माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील हेदेखील सक्रिय आहेत की नाहीत? हा प्रश्‍न आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर भागातील शिवसेनेचे पदाधिकारी महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारात सक्रिय होत नसल्याची स्थिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 BJP Dispute Politics