Loksabha 2019 : 'गरिबी हटाव'चा नारा देताना लाज कशी वाटत नाही? - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

पाकिस्तानशी चर्चा नाही
पाकिस्तानबाबत कॉंग्रेसच्या धोरणावर मुख्यमंत्र्यांनी कडाडून टीका केली. 'दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला त्या वेळी सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस सरकारने कोणतेही कडक धोरण स्वीकारले नाही. केवळ त्यांच्याशी ते चर्चाच करतात. आता आम्हाला चर्चा मंजूर नाही. आता हल्ला केला, तर आम्ही थेट घरात घुसून मारतो,'' असे मुख्यमंत्री म्हणाले.

जळगाव - कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे आजोबा पंडित नेहरू, आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी, आई सोनिया गांधी यांनी "गरिबी हटाव'चा नारा दिला. परंतु, आजपर्यंत गरिबी हटली नाही. आता राहुल गांधीही तोच नारा देत आहेत. अशी खोटी आश्‍वासने देताना यांना लाज कशी वाटत नाही? हे गरिबी हटवूच शकत नाहीत. या देशातील गरिबी केवळ नरेंद्र मोदीच हटवू शकतात, असे स्पष्ट मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथे जाहीर सभेत बोलताना व्यक्त केले.

भारतीय जनता पक्ष, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ सागरपार्कवर सभा घेण्यात आली.

फडणवीस म्हणाले, 'सध्या होत असलेली लोकसभा निवडणूक ही देशाची सीमा सुरक्षित ठेवणारी तसेच विकासाची निवडणूक आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनाचारी, दुराचारी व भ्रष्टाचारींना सत्तेपासून दूर ठेवणारी ही निवडणूक आहे.''

'कॅप्टन'ची माघार
राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, ""राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी माढा येथील लढतीतून माघार घेतली आहे. त्यामुळे त्यांचे खेळाडू आमच्याविरुद्ध कसे लढणार? त्यामुळे कॉंग्रेस व "राष्ट्रवादी'च्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नाही. त्यांची हिंमत खचली आहे. त्यामुळे आता निवडणुकीत लढाईच राहिलेली नाही.''

पाकिस्तानशी चर्चा नाही
पाकिस्तानबाबत कॉंग्रेसच्या धोरणावर मुख्यमंत्र्यांनी कडाडून टीका केली. 'दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला त्या वेळी सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस सरकारने कोणतेही कडक धोरण स्वीकारले नाही. केवळ त्यांच्याशी ते चर्चाच करतात. आता आम्हाला चर्चा मंजूर नाही. आता हल्ला केला, तर आम्ही थेट घरात घुसून मारतो,'' असे मुख्यमंत्री म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Election 2019 Devendra Fadnavis Speech Rahul Gandhi Politics