Election Results : भाजपचे उमेदवार अशोक नेते आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

नागपूर : पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे.

गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपचे अशोक नेते व कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यात थेट लढत आहे. भाजपचे अशोक नेते आघाडीवर आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार असून अंतिम निकाल घोषित होण्याकरिता सुमारे 14 तासांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे. 

विदर्भातील भंडारा-गोंदिया, नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांत 11 एप्रिल रोजी तर अमरावती, अकोला व बुलडाणा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या तब्बल दीड महिन्यानंतर गुरुवारी (ता. 23) मतमोजणी होणार आहे. त्यामुळे विदर्भवासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नागपूर, चंद्रपूर व अकोला मतदारसंघांतील निकालाकडे साऱ्या राज्याचे व देशाचेही लक्ष लागले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Candidate Ashok nete on lead