Election Results : केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांच्या चंद्रापूर मतदारसंघात काय होणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

चंद्रपूर मतदारसंघातून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये आलेले सुरेश (बाळू) धानोरकर यांनी आव्हान दिले आहे.

नागपूर : चंद्रपूर : भाजपचे हंसराज अहीर 1316 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात बाळू धानेरकर पिछाडीवर आहेत.

पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार असून अंतिम निकाल घोषित होण्याकरिता सुमारे 14 तासांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे. 

नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपातून कॉंग्रेसमध्ये आलेले नाना पटोले यांनी तर, चंद्रपूर मतदारसंघातून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये आलेले सुरेश (बाळू) धानोरकर यांनी आव्हान दिले आहे. तसेच संपूर्ण राज्यात तिसरी शक्ती म्हणून समोर येण्याचा प्रयत्न करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर हे अकोला मतदारसंघात भाजपचे संजय धोत्रे व कॉंग्रेसचे हिदायतुल्ला पटेल यांना तिहेरी लढतीत आव्हान देत आहे. 

विदर्भातील भंडारा-गोंदिया, नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांत 11 एप्रिल रोजी तर अमरावती, अकोला व बुलडाणा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या तब्बल दीड महिन्यानंतर गुरुवारी (ता. 23) मतमोजणी होणार आहे. त्यामुळे विदर्भवासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नागपूर, चंद्रपूर व अकोला मतदारसंघांतील निकालाकडे साऱ्या राज्याचे व देशाचेही लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who wins in Chandrapur Loksabha constituency