Loksabha 2019 : मोदींना हरवल्यानंतर त्यांना चौकीदाराचेच काम देऊ: शरद पवार

वृत्तसंस्था
सोमवार, 15 एप्रिल 2019

- मोदींना चौकीदाराचेच काम देऊ
- विकासासाठी जनतेने भाजप-सेनेची सत्ता देशात आणि राज्यात आणली
- विकासाचं मॉडेल मात्र तर आलेच नाही आत्महत्यांचे सत्र वाढले.

बुलडाणा: नरेंद्र मोदींना हरवल्यानंतर त्यांना चौकीदाराचेच काम देऊ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. विकासाचं मॉडेल बघण्यासाठी जनतेनी भाजप-सेनेची सत्ता देशात आणि राज्यात आणली. मात्र विकासाचं मॉडेल तर आलेच नाही आत्महत्यांचे सत्र वाढले. देशाच्या सत्तेमध्ये शेतकऱ्यांप्रती आस्था नसलेल्या व्यक्तींचा भरना असल्याने या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचेही पवार यांनी म्हटले. 

शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना काँग्रेसच्या कार्यकाळात आम्ही आमलात आणल्या. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी केली. देशात सत्ता आल्यास आम्ही सरसकट कर्जमाफी करू आणि शेतकऱ्यांच्या शेत मालाला दीडपट हमीभाव देऊ असे आश्वासन पवार यांनी दिेले. जगाच्या दबावापुढे अभिनंदनला पाकिस्तानने सोडले.  मात्र, मोदी याचं श्रेय घेण्यात मग्न आहेत 56 इंच छाती असणार्‍या मोदींनी कुलभूषणला का सोडवले नाही असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

न खाऊंगा ना खाने दुंगाचा आव आणणाऱ्यांनी  350 कोटींचे विमान 1650 कोटीला खरेदी केले आहे. अंबानींनी कधी कागदाचे विमान सुद्धा तयार केले नाही त्यां अंबानीना राफेल विमान तयार करण्याची जबाबदारी या शासनाने दिली.

Web Title: will give the work of Chowkidar to Narendra Modi after election loss says Sharad Pawar