लोकसभेसाठी 34 हजार मतदारांसह 28 मतदान केंद्रही वाढले 

voting
voting

येवला : येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात तब्बल ३४ हजार मतदार वाढले आहे या वाढलेल्या मतदारांमुळे मतदान केंद्रांची संख्याही २८ ने वाढली असून ती आता ३१६ झाली आहे. मतदारसंघातील येवला शहर विंचुर लासलगाव सह मोठ्या गावात एक हजार २०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्र संख्या वाढली आहेत.

२९ एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात मागील निवडणुकीला २८८ मतदान केंद्र होते आता हीच संख्या ३१६ झाली आहे.तसेच गेल्यावेळी येवला मतदारसंघात २ लाख ६१ हजार ७३९ मतदार होते.मात्र यावेळी हा आकडा १ लाख ५६ हजार २९ पुरुष तर १ लाख ३९ हजार ५३८ महिला आणि ६ तृतीयपंथी असे २ लाख ९५ हजार ५७३ मतदार इतका झाला आहेत. मतदारसंघात येवले तालुक्यातील १२४ आणि निफाड तालुक्यातील लासलगाव विंचूर परिसरातील ४३ गावांचा मिळून विधानसभा मतदारसंघ तयार झाला आहे. गेल्या वेळच्या तुलनेत यावेळी वाढलेली मतदार व केंद्रही वाढले असले तरी ते कुणाच्या फायद्याचे ठरणार हे गणित मांडणे अवघड आहे.

मात्र  मतदार वाढल्यामुळे उमेदवारांना जास्त फिरण्याची वेळ येणार आहे,तर मतदान केंद्र वाढल्यामुळे मतदारांना जास्त वेळ रांगेत राहण्याची वेळ येणार नाही असा दुहेरी फायदा झालेला दिसतो. यावेळी एका मतदान केंद्रावर १२०० पर्यंत मतदार संख्या निश्चित करण्यात आली आहे.त्यामुळे मतदारांची वाढ गृहीत धरून मतदान केंद्रात वाढ झाल्याचेही दिसते. येवला शहरात तीन तर विंचूरमध्ये एक केंद्र वाढले असून ग्रामीण भागातही वाढलेल्या मतदारांनुसार केंद्रात वाढ झाल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितले. 

पूर्वी काँग्रेसला,१९९५ नंतर शिवसेनेला तर २००४ पासून राष्ट्रवादीला साथ देणाऱ्या या मतदारसंघात लोकसभेला मात्र २००९ पासून भाजपाचाच आजपर्यत वरचष्मा नेहमी राहिला असून एका पक्षाची मक्तेदारी या मतदारसंघात नसल्याचेही दिसून येते. मतदारांचा आकडा तीन लाखापर्यंत शिवला गेल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांची प्रचारासाठी नक्कीच यावेळी फेऱ्या वाढताना दिसतील. सध्या उमेदवारांनी एकगठ्ठा मतं असलेले येवला, लासलगाव, विंचूर, देवगाव, अंदरसुल, नगरसुल, पाटोदा, मुखेड, राजापूर या मोठ्या गावांना प्रचारासाठी प्राधन्य दिलेले दिसतेय.

स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी प्रचाराची सूत्रे काही प्रमाणात हाती घेतल्याने अनेक गावात आत्तपर्यत पहिली फेरी तीही सभेचा रूपात पूर्ण झाल्याचेही सांगण्यात येते.येथील महसूल प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्णपणे केली असून नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांचे दोन प्रशिक्षण येथे झाल्यानंतर रविवार व सोमवारी पुढील प्रशिक्षण त्या कर्मचाऱ्यांच्या निवडणुकीच्या तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com