Pune Loksabha 2019 : पुणे लोकसभा मतदारसंघात 49.84 टक्के मतदान

Pune.jpg
Pune.jpg

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा निवडणूक आयोगाने मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली. त्यात पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा 49.84 टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीत 54.14 टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यात चुरशीची लढत झाली. पुणे लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी 23 एप्रिलला मतदान झाले. मतदानाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत मतदानाची आकडेवारी एकत्रित करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू होते.


जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी काल 52 टक्के जवळपास मतदान झाल्याची माहिती दिली होती. परंतु ही अंतिम आकडेवारी नसल्याचे स्पष्ट केले होते. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा प्रशासनाने मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली. त्यात वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात 46.41 टक्के, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात 46.94 टक्के,  कोथरूड विधानसभा मतदारसंघात 50.26 टक्के, पर्वती विधानसभा मतदारसंघात 52.07 टक्के, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात 48.79 टक्के आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 55.88 टक्के मतदान झाले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात 20 लाख 75 हजार 39 मतदार आहेत. त्यापैकी दहा लाख 34 हजार 154 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

वडगाव शेरी आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन लाखाहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com