Loksabha 2019 : चक्क ८१व्या वर्षी केले पहिले मतदान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर मतदान करण्याचा संकल्प तरुण करतात, मात्र लष्करातून निवृत्त झालेल्या ८१ वर्षांच्या लष्करी अधिकाऱ्याने आज पहिल्यांदा मतदान केले आहे. 

पुणे : वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर मतदान करण्याचा संकल्प तरुण करतात, मात्र लष्करातून निवृत्त झालेल्या ८१ वर्षांच्या लष्करी अधिकाऱ्याने आज पहिल्यांदा मतदान केले आहे. निवृत्त कर्नल मंगलसिंह मान असे या मतदाराचे नाव आहे.

राजकारण चांगले नाही, उमेदवार सक्षम, आपला विकास करणार वाटत नव्हता, त्यामुळे  मी इतके वर्ष मतदान करत नव्हतो. कर्नल मान यांनी मतदान करावे यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी मनधरणी केली आणि अखेर विमाननगर येथील इंटरविडा उत्कर्ष शिक्षण केंद्र या मतदान केंद्रावर त्यांनी सहकुटुंब येऊन मतदान केले.

 मान म्हणाले, ''राजकारण वाईट आहे,  देश चालविण्यासाठी लायक व्यक्ती मला दिसत नव्हती, त्यामुळे मी मतदान करत नव्हतो,  पण यावेळी मी मतदान केले आहे.  मी ८१ वर्षाचा असलो तरी 'फस्ट टाईम वोट' केल्याचा आनंद आहे.  मान यांनी ८१ व्या वर्षी मतदान केले याचा आनंद आहे अशी भावना त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 81 years old person becomes a new voter in pune constituency for Loksabha 2019