Loksabha 2019 : औरंगाबादमध्ये दोन तासात 9 टक्के मतदान झाले

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 एप्रिल 2019

औरंगाबाद - येथे सकाळी 7 वाजता मतदानाला सुरवात झाली. तेंव्हापासूनच शहरातील विविध मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उष्णतेचा पारा वाढल्याने मतदारांनी सकाळच्या सत्रात बाहेर पडत मतदानाचा हक्क बजावणे पसंद केले. सकाळी 9 वाजेपर्यंत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 9.04 टक्के मतदान झाले. जिल्हा परिषदेतील मतदान केंद्रावर शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपल्या कुटुंबियांसहसह मतदानाचा हक्क बाजवला. जिल्हाभरात जनजागृती केल्याने या लोकसभेला मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी काही

खैरे मतदान करतानाच बंद पडले मशीन
खैरे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आले मतदान करण्यासाठी ईव्हीएम मशीनजवळ गेले असता अचानक मशीन बंद पडले. काही वेळाने मशीन सुरू झाल्यानंतर त्यांनी मतदान केले. दरम्यान मतदान केंद्राबाहेर पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान मशीन बंद पडल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.

शांतिगिरी महाराजांची ट्रॅक्टरमधून एन्ट्री
अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना जाहीर पाठिंबा घोषित केलेले शांतिगिरी महाराज यांनी जाधव यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या सजविलेल्या ट्रॅक्टरमधून येत मतदान केले. त्याच्या या अभिनव कल्पनेची चर्चा रंगली होती. ग्रामीणच्या गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यांमध्ये महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना जाहीर पाठिंबा घोषित केलेले शांतिगिरी महाराज यांनी जाधव यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या सजविलेल्या ट्रॅक्टरमधून येत मतदान केले. त्याच्या या अभिनव कल्पनेची चर्चा रंगली होती. ग्रामीणच्या गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यांमध्ये महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे. 

एका केंद्रावर जवान तैनात 
अकरा वाजेपर्यंत आंबेडकर नगर येथील पाच मतदान केंद्रात सरासरी 22 टक्के मतदान झाले. अतिसंवेदनशील एका केंद्रावर सीआयएसएफ जवान तैनात करण्यात आलेले आहेत.

व्हील चेअरवर येऊन बजावला हक्क
हनुमान टेकडी परिसर येथे राहणारे बबन सदावर्ते यांनी समाज मंदिर मतदान केंद्रावर व्हील चेअरवर येत मुलीसह मतदानाचा हक्क बजावला.

नवमतदारांचे स्वागत
पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवगड तांडा येथे नवमतदारांचे औक्षण करून आणि गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले.

प्रशासनाची जय्यत तयारी
मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जागोजागी शांततेत मतदान सुरू असून मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी विविध मतदान केंद्रावर भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 9 percent voting took place in two hours In Aurangabad