Loksabha 2019 : 'अखेरच्या क्षणी मुस्लिमांची मते काँग्रेसला गेली नाहीतर...'

वृत्तसंस्था
शनिवार, 18 मे 2019

निवडणुकीच्या 48 तासांपूर्वी दिल्लीतील सातही जागांवर आमचा विजय होणार होता. पण, ऐनवेळी मुस्लिमांची मते काँग्रेसकडे वळाली. याचे कारण शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. दिल्लीत 12 ते 13 टक्के मुस्लिम मतदार आहेत. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील मतदारसंघात अखेरच्या क्षणी मुस्लिमांची मते काँग्रेसकडे गेली. त्यामुळे आम्हाला दिल्लीतील सातही जागा जिंकणे कठीण झाल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे. त्यापूर्वी केजरीवाल यांनी हा दावा केला आहे. दिल्लीतील सातही जागांवर विजय मिळविण्याचा केजरीवाल यांना विश्वास होता. पण, मुस्लिमांची मते ऐनवेळी काँग्रेसला गेल्याचा आरोप त्यांनी केले आहे.

केजरीवाल म्हणाले, की निवडणुकीच्या 48 तासांपूर्वी दिल्लीतील सातही जागांवर आमचा विजय होणार होता. पण, ऐनवेळी मुस्लिमांची मते काँग्रेसकडे वळाली. याचे कारण शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. दिल्लीत 12 ते 13 टक्के मुस्लिम मतदार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AAP chief Arvind Kejriwal says Muslim votes shifted to Congress in Delhi