Loksabha 2019 : बसप-सप मैत्री 23 मे रोजी संपेल : नरेंद्र मोदी

पीटीआय
रविवार, 21 एप्रिल 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बनावट मागासवर्गीय असल्याची टीका करणाऱ्या बसप नेत्या मायावती यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर देत समाजवादी पक्ष आणि बसप यांच्यातील मैत्री बनावट असून, निकालाच्या दिवशी ती कोसळेल, असे भाकीत केले. 

इटाह (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बनावट मागासवर्गीय असल्याची टीका करणाऱ्या बसप नेत्या मायावती यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर देत समाजवादी पक्ष आणि बसप यांच्यातील मैत्री बनावट असून, निकालाच्या दिवशी ती कोसळेल, असे भाकीत केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखिलेश यादव आणि मायावती यांच्या आघाडीवर टीका केली. ते म्हणाले की, स्वार्थासाठी सप आणि बसपने आघाडी केली असून, सध्या त्यांची स्थिती आपण पाहत आहात. निवडणुकीच्या निकालानंतर उत्तर प्रदेशात "शत्रू-पार्ट टू' सुरू होईल. कालपर्यंत हे एकमेकांचा चेहरा पाहत नव्हते. आज त्यांच्यात बनावट मैत्री झाली आहे. ही मैत्री तुटण्याची तारीखदेखील निश्‍चित आहे. 23 मे रोजी त्यांची मैत्री तुटणार आहे. बुआ आणि बबुआ यांच्यात पुन्हा एकदा शत्रुत्व निर्माण होईल.

मोदी यांनी अखिलेश यादव आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. एक मैत्री उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणूक काळात झाली होती. निवडणुका संपल्या, मैत्रीदेखील संपली आणि शत्रुत्व सुरू झाले. आता पुन्हा मैत्रीपर्व सुरू झाले आहे. संधी साधणारी ही मैत्री तुटण्याची तारीखदेखील निश्‍चित आहे. 23 मे रोजी ही बनावट मैत्री तुटेल, असे मोदी म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After 23 May BSP SP Ties will be Finished says Narendra Modi