Loksabha 2019 : भाजप म्हणजे 'भागती जनता पक्ष' : अखिलेश यादव

पीटीआय
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

भारतीय जनता पक्षाचा नवा अर्थ 'भागती जनता पक्ष' असल्याचे सांगत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

लखनौ (पीटीआय) : भारतीय जनता पक्षाचा नवा अर्थ 'भागती जनता पक्ष' असल्याचे सांगत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पत्रकार परिषद आणि जेव्हा जेव्हा पत्रकार प्रश्‍न विचारतात त्यापासून पलायन करणारा पक्ष असे नव्याने वर्णन त्यांनी केले.

"तुम्ही काही नवे ऐकले आहे का, असे "विकास' विचारत आहे. लोकांनी भाजपचा नवा अर्थ "भागती जनता पक्ष' असा काढल्याचे ऐकिवात आले आहे. कारण पंतप्रधान पत्रकार परिषदेपासून पलायन करतात. त्यांचे नेते पत्रकारांच्या प्रश्‍नांपासून पळ काढतात आणि त्यांचे पक्ष कार्यकर्ते 15 लाख रुपये व रोजगार मागणाऱ्यांपासून पळतात,'' असे ट्विट अखिलेश यादव यांनी केले आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये अखिलेश यांनी नोटाबंदीदरम्यान जन्म झालेल्या "खजांची' नावाच्या बाळाचे छायाचित्र टॅग करून "पंतप्रधान नरेंद्र मोदी जी तुम्ही या बालकाला ओळखले का?' असा सवाल केला आहे. याचे नाव खजांची आहे.

नोदाबंदीदरम्यान याचा बॅंकेत जन्म झाला. ज्यांनी त्याच्या आईला वेदना दिल्या, अशा पक्षाविरोधात मत देण्याचा हट्ट तो करू लागला आहे. आम्ही त्याला समजावले आहे की, तू अजून खूप लहान आहे आणि तसेही जो तुझ्याशी वाईट वागेल, त्याच्याशी वाईट वागणे ही चांगली गोष्ट नाही.

Web Title: Akhilesh Yadav made new name for BJP called Bhagati Janata Party