Loksabha 2019 : 'फिर एक बार मोदी सरकार' ही तर जनतेचीच घोषणा : अमित शहा

शुक्रवार, 17 मे 2019

यंदाच्या निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा नाही

नवी दिल्ली : मोदी सरकार पुन्हा येण्याबाबतची घोषणा देशातील जनतेने केली आहे. त्यांच्याकडून 'फिर एक बार मोदी सरकार'चा नारा दिला गेला. त्यानंतर 'बार-बार मोदी सरकार' असे प्रत्युत्तर मिळत होते, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शुक्रवार) सांगितले. 

नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत अमित शहा बोलत होते. यावेळी शहा यांच्यासोबत पंतप्रधान नरेद्र मोदी उपस्थित होते. अमित शहा म्हणाले, सर्वांत जास्त मेहनत असणारी निवडणूक अभियान यंदा पार पडले. भाजप संघटनात्मक आधारावर काम करत आहे. 2014 मध्ये झालेला ऐतिहासिक विजय जनतेमुळे होऊ शकला. पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकार सत्तेवर आले. या पाच वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींनी 133 योजना आणल्या. या योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब, जनतेसाठी प्रयत्न केले. या योजनेचे देशात मोठे योगदान आहे. या निवडणूक कार्यक्रमात 142 सभा, 4 रोड शो घेण्यात आले होत. एक कोटी 50 लाख लोकांसोबत मोदींनी थेट संपर्क साधला, असेही ते म्हणाले.

यंदाच्या निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा नाही

2014 मध्ये 6 राज्यांत आमचे सरकार होते. मात्र, आता 16 राज्यांत आमचे सरकार आहे. विरोधकांकडून भ्रष्टाचार आणि महागाईचा मुद्दा या निवडणुकीत उचलण्यात आला नाही.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shaha says Indian voters chose the slogan fir ek baar modi sarkar