Loksabha 2019 : माझ्यावर हल्ला म्हणजे 'आप' संपविण्याचे षड्यंत्र : केजरीवाल

वृत्तसंस्था
रविवार, 5 मे 2019

- मुख्यमंत्रिपदावर असताना आत्तापर्यंत झाला पाचवेळा हल्ला.

- आम आदमी पक्ष संपविण्याचे हे एक षड्यंत्र.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक (आप) अरविंद केजरीवाल यांना एका तरुणाने रोड शोदरम्यान काल (शनिवार) कानशिलात लगावली. त्यावर केजरीवाल म्हणाले, ''सुरक्षेतील निष्काळजीपणाला केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असून, आम आदमी पक्षाला संपविण्याचे हे षड्यंत्र आहे''.  

अरविंद केजरीवाल यांच्यावर मागील पाच वर्षांत नऊवेळा हल्ला झाला तर मुख्यमंत्रिपदावर असताना तब्बल पाचवेळा हल्ला झाला. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर इतक्यावेळा हल्ले होणे ही पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे. या हल्ल्यानंतर केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की ''हे हल्ले माझ्यावर नसून, दिल्लीतील जनतेवर झाले आहेत. राज्यातील जनतेने निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांवर झाले आहेत. त्यामुळे या हल्ल्याचा बदला दिल्लीतील जनता नक्कीच घेईल''.

अशा हल्ल्यांनी माझा आवाज बंद होणार नाही

माझ्यावर काल हल्ला झाला. तसेच यापूर्वी अनेक हल्ले झाले आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या हल्ल्यांनी आमचा आवाज बंद होणार नाही. तसेच यांसारख्या प्रकारामुळे आमचे धाडस संपणार नाही, असेही केजरीवाल म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on me there is Conspiracy to Finish AAP says Arvind Kejriwal