esakal | Loksabha 2019 : दानवेंच्या पराभवासाठी बच्चु कडू तीन दिवस जालन्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Bacchu Kadu

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्‍थापक आमदार बच्चु कडू यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांना पाठींबी जाहीर केला आहे.

Loksabha 2019 : दानवेंच्या पराभवासाठी बच्चु कडू तीन दिवस जालन्यात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जालना : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्‍थापक आमदार बच्चु कडू यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांना पाठींबी जाहीर केला आहे. तीन दिवस जालन्यात तळ ठोकून त्यांचा प्रचार करणार असल्याचे  त्यांनी शनिवारी  (ता.20) आयोजित पत्राकर परिषदेत  सांगितले.  या पत्रकार परिषदेस जयाजीराव सुर्यवंशी, विधुर लगडे, साईनाथ चिन्नादोरे, यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

शेतकरी विरोधी  वक्तव्यावरून आमदार बच्चु कडू यांनी रावसाहेब दानवेंना निवडणुकीत पराभूत करण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या विरोधात निवडणुक रिंगणात न उतरता त्यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विलास औताडे यांना पाठींबा  देण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या प्रचारार्थ संपूर्ण मतदारसंघात काही दिवसांपासून ते सभा आणि बैठकांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत आहे.  गेल्या निवडणुकीत औताडे  यांनी रावसाहेब दानवे विरोधात निवडणुक लढवली होती.  त्यात तीन लाखाहून अधिक मते मिळाली होती.

रावसाहेब दानवे आणि त्यांच्यातच लढत होणार असल्याने त्यांना पाठींबा जाहीर केल असून निवडणुकीत एक ते सव्वा लाख मतांची दरी आम्ही भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदान होईपर्यंत जालन्यात तळ ठोकून त्यांचा प्रचार करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

loading image