Loksabha 2019 : अमेठीत भाजपकडून पैसे वाटप : प्रियांका गांधी

वृत्तसंस्था
Saturday, 4 May 2019

- प्रत्येकी दिले जात आहेत 20 हजार रुपये.

नवी दिल्ली : अमेठी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी निवडणूक लढवित आहेत. या मतदारसंघात भाजपकडून मतदारांना पैसे वाटप केले जात आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज (शनिवार) केला.  

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांना अमेठीतून उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही स्मृती इराणी यांना राहुल गांधींविरोधात भाजपने मैदानात उतरवले आहे. त्यानंतर आता प्रियांका गांधी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये प्रियांका गांधी म्हणाल्या, अमेठी लोकसभा मतदारसंघातील सरपंचांना भाजपकडून प्रत्येकी 20 हजार रुपये दिले जात आहे. 20 हजार रुपयांत सरपंच विकतील, असे भाजपवाल्यांना वाटत असतील तर हे हास्यास्पद आहे.

दरम्यान, अमेठी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात आहे. त्यामुळे आता ही जागा ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP are Distributing money in Amethi says Priyanka Gandhi