Loksabha 2019 : भाजपवाल्यांना माझी भीती : राज ठाकरे

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 एप्रिल 2019

- भाजपने माझी धास्ती घेतलीये

इचलकरंजी : महाराष्ट्र आजही औद्योगिक क्षेत्रासह सगळ्याच बाबतीत पुढे आहे. माझा उमेदवार नाही तरीही भाजपवाले फडफडत आहेत. त्यामुळेच त्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतलीये. भाजपने माझी धास्ती घेतलीये, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर आज (मंगळवार) टीकास्त्र सोडले. 

इचलकरंजी येथे आयोजित प्रचारसभेत राज ठाकरे बोलत आहेत. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 1947 पासून कधीही उघडपणे बोलले नाहीत. ते आता या सरकारच्या कार्यकाळात पुढे आले आहेत. या चार न्यायाधीशांनी अशाप्रकारे का पत्रकार परिषद घेतली याचे उत्तर सरकारने द्यायला हवे. तसेच या सरकारच्या कामाविरोधात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या रघुराम राजन आणि उर्जित पटेल या दोन गर्व्हनरनी राजीनामा दिला. 

दरम्यान, माझ्यामुळे इथून पुढे कोणताही नेता खोटं बोलणार नाही. मोदी सरकारकडून साडेचार हजार कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केला गेला, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP are Fearing to me says Raj Thackeray