Loksabha 2019 : शेतकऱ्याला पैसे मिळाले तर भाजपवाले आंदोलन करतात : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

शेतकऱ्याला चार पैसे मिळत असतील तर भाजपवाले आंदोलन करतात.

निफाड : शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांची दिवाळी चांगली होते. मात्र, त्यांच्या शेतमालाला भावच नसेल तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. असे मत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केले. निफाड येथे महाआघाडीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले, मी कृषि मंत्री असतांना कांद्याच्या प्रश्नावरून नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो, तेव्हा शेतकरी भेटले कांद्यावरील तात्काळ निर्यात बंदी उठवली. मात्र, त्याचवेळेस किमती वाढल्यावर भाजपच्या खासदारांनी कांद्याच्या माळा घालून 'शरद पवार होश में आवो'च्या घोषणा देत संसद बंद पाडली होती. त्यावेळच्या सभापतींनी मला यावर उत्तर द्यायला सांगितले. परंतु, मी ठासून कांद्याच्या किमती जाणीवपूर्वक वाढवल्याचे सांगितले होते. कधी नाही तर शेतकऱ्याला चार पैसे मिळत असतील तर भाजपवाले आंदोलन करतात असे बोलत पवार यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leaders agitated if farmers got money