Loksabha 2019 : भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, 'दहशतवाद म्हणजे बलिदानाचे प्रतिक'

वृत्तसंस्था
Thursday, 25 April 2019

- भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केले हे वक्तव्य.

- दहशतवाद हा प्रेम, तपस्या आणि बलिदानाचे प्रतिक.

नवी दिल्ली : भगवा कधीही दहशतवाद होऊ शकत नाही आणि भगवा परिधान करणारा दहशतवादी असू शकत नाही. दहशतवाद तर प्रेम, तपस्या आणि बलिदानाचे प्रतिक असते, असे वक्तव्य मध्य प्रदेशातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

राकेश सिंह हे जबलपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. मध्य प्रदेशामध्ये आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. राकेश सिंह म्हणाले, की भगवा कधीही दहशतवाद होऊ शकत नाही. भगवा धारण करणारी व्यक्ती कधीही दहशतवादी होऊ शकत नाही. तसेच दहशतवाद हा प्रेम, तपस्या आणि बलिदानाचे प्रतिक आहे.

दरम्यान, भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिल्यानंतर विरोधकांनी त्यांना दहशतवादी म्हटले होते. त्यांच्या टीकेला उत्तर देताना राकेश सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP Rakesh Singh said about Terrorism Issue