कारणराजकरण : शेकापच्या बालेकिल्ल्यात भाजपची शिवसेनेला साथ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

पनवेल (नवी मुंबई) : एकेकाळी रायगड जिल्हा हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला मानला जात असे. याच रायगड जिल्ह्यातील पनवेल विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी शिवसेनेला भाजपची साथ मिळणार आहे. 

पनवेल (नवी मुंबई) : एकेकाळी रायगड जिल्हा हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला मानला जात असे. याच रायगड जिल्ह्यातील पनवेल विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी शिवसेनेला भाजपची साथ मिळणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या पनवेल महानगरपालिकेत भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे. ५२ नगरसेवक भाजपचे आहेत

'सकाळ'च्या कारणराजकारण मालिकेअंतर्गत पनवेलमधील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांच्या बोलण्यातून अनेक स्थानिक मुद्दे समोर आले. शिवसेनेकडून 'ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती' अशी निवडणूक असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून आणि शेकापकडून धनशक्तीचा वापर करण्यात आला असल्याचा आरोपही केला गेला.
पनवेलमध्ये अन्य स्थानिक मुद्देही आहेत. त्या मुद्द्यावरही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आरोप प्रत्यारोप केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Supports Shivsena in Panvel of Maval Loksabha Constituency