Loksabha 2019 : ईव्हीएम यंत्रांवर भाजपचे नाव

श्‍यामल रॉय
Sunday, 28 April 2019

पश्‍चिम बंगालमधील बराकपूर लोकसभा मतदारसंघासाठी ईव्हीएम यंत्रांवर भारतीय जनता पक्षाचे नाव व कमळ हे चिन्ह त्यावर प्रसिद्ध केल्याचे निदर्शनास आले आहे. ईव्हीम यंत्रांची चाचणी शुक्रवारी घेत असताना हा प्रकार उघडकीस आला. 

कोलकता : पश्‍चिम बंगालमधील बराकपूर लोकसभा मतदारसंघासाठी ईव्हीएम यंत्रांवर भारतीय जनता पक्षाचे नाव व कमळ हे चिन्ह त्यावर प्रसिद्ध केल्याचे निदर्शनास आले आहे. ईव्हीम यंत्रांची चाचणी शुक्रवारी घेत असताना हा प्रकार उघडकीस आला.

तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या प्रतिनिधीने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अरिफ अफ्तार यांच्याकडे तत्काळ निषेध नोंदविला असून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. राज्य निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ईव्हीएम यंत्रांवर भाजपच्या नावासह पक्षाचे कमळ हे चिन्ह आढळून आल्याने तृणमूल कॉंग्रेसने त्यावर आक्षेप घेतला. अशा प्रकारे सत्ताधारी भाजपचेच नाव ईव्हीएम यंत्रांवर कसे प्रसिद्ध केले, असा सवाल त्यांनी केला.

आम आदमी पक्ष, तेलुगू देशम पक्ष आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षानेही ही बाब निवडणूक आयेगासमोर उपस्थित केली आहे. ईव्हीएम यंत्रांवर कोणत्याही राजकीय पक्षांचे नाव देता येत नाही, तर केवळ चिन्ह असते. असे करणे म्हणजे सत्ताधारी पक्षाला झुकते माप देण्यासारखे आहे, असा आरोप तृणमूल कॉंग्रेसचे सरचिटणीस पार्थो चट्टोपाध्याय यांनी केला. बराकपूरमध्ये 6 मे रोजी मतदान होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJPs name on EVM devices