Loksabha 2019 : प्रचारबंदी संपताच मायावतींची निवडणूक आयोगावरच टीका

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 एप्रिल 2019

भाजप नेत्यांबाबत निवडणूक आयोगाकडून दुर्लक्ष केले जात असेल तर ही निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष होण्याची शक्यता कठिण.

- मायावती, सर्वेसर्वा, बहुजन समाज पक्ष.

नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रचारबंदीची केली होती. त्यांच्यावरील कारवाई संपल्यानंतर मायावतींनी आता थेट निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रचारबंदीचे उल्लघंन केले जात आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल मायावती यांनी निवडणूक आयोगाला केला आहे. मायावती यांनी ट्विटरवरुन निवडणूक आयोगावर टीका केली.

मायावती यांनी ट्विटरवरून सांगितले, की ''योगी आदित्यनाथ यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या प्रचारबंदीचे उल्लंघन केले जात आहे. आदित्यनाथ मंदिर, शहर आणि दलितांच्या घराबाहेर जाऊन जेवण करण्याचे नाटक करत आहेत. या गोष्टींचे प्रसारण मीडियामध्ये करुन निवडणुकीत लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे केले जात असताना निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई का करत नाही'', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, भाजप नेत्यांबाबत निवडणूक आयोगाकडून दुर्लक्ष केले जात असेल तर ही निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष होण्याची शक्यता कठिण आहे, असेही मायावती यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BSP Chief Mayawati Criticizes Election Commission over Yogi Adityanath Issue