कारणराजकारण : बारामती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजनचे आव्हान

बुधवार, 10 एप्रिल 2019

बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत मानली जात आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या नवनाथ पडळकर यांच्याकडे ही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना पडणारी मते निर्णायक भूमिका बजावतील, अशी सध्या परिस्थिती आहे.

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत मानली जात आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या नवनाथ पडळकर यांच्याकडे ही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना पडणारी मते निर्णायक भूमिका बजावतील, अशी सध्या परिस्थिती आहे.

 

सुळे आणि कुल यांच्या लढतीत पडळकर यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असलं तरी मतदारसंघात धनगर समाजाची असलेली मोठी संख्या लक्षात घेता पडळकर यांचे महत्त्व वाढले आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काही प्रमाणात  नेते प्रकाश आंबेडकर यांना मानणारा वर्ग त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची शक्यता आहे. 

बारामती मतदारसंघातील इंदापूर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने मोठे आव्हान निर्माण केले असून याचा पडळकर यांना फायदा होईल असे चित्र आहे. मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या मोठ्या नेत्यांची मतदार संघात सभा झाली नाही तरी, आम्ही आमच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करु, असे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सांगतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Challenge of Vanchit Bahujan Aghadi in Baramati Loksabha Constituency