Loksabha 2019 : शरद पवार यांची सद्सद्विवेक बुद्धी शाबूत राहिलेली नाही : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

राष्ट्रवादीच्या फलंदाजाने सलामीला फलंदाजीला यायची तयारी केली. पण, मोदींना पाहून ते बारावा खेळाडू म्हणून बाहेर गेले. पवारांची बुद्धी ठिकाणावर राहिली नाही, त्यामुळे ते बुद्धीभेद करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नाशिक : राष्ट्रवादीच्या फलंदाजाने सलामीला फलंदाजीला यायची तयारी केली. पण, मोदींना पाहून ते बारावा खेळाडू म्हणून बाहेर गेले. पवारांची बुद्धी ठिकाणावर राहिली नाही, त्यामुळे ते बुद्धीभेद करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (सोमवार) सभा झाली. दिंडोरीच्या उमेदवार भारती पवार आणि नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, गिरीश महाजन आदी नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, की नाशिक जिल्ह्यातील काही राष्ट्रवादीचे बहुरुपी स्वातंत्र्यसैनिक असल्यासारखे बोलत आहेत. पण, तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून कारागृहात गेलात. मोदींच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचाराला थारा नाही. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले असून, मोठी गुंतवणूक येथे आली आहे. आदिवासींच्या सवलतींना कोणी हात लावू शकत नाही. सरकारने मुद्रा योजनेत आतापर्यंत 4 लाख जणांना कर्ज दिले आहे. भारताचे चित्र आता बदलले आहे. विरोधकांकडे मुद्दे नाहीत, त्यामुळे बुद्धीभेद करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar at Nahik