Loksabha 2019 : गुजरातला जाणाऱ्या पाण्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे : भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

- जिल्ह्यासह महाराष्ट्रातून शेकडो टीएमसी पाणी जाते गुजरातला.

येवला : जिल्ह्यासह महाराष्ट्रातून शेकडो टीएमसी पाणी गुजरातला जाते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील सभांमधून जाहीरपणे उत्तर द्यावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली. तसेच सत्तेसाठी व मतांसाठी विनाकारण नाशिकच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक करू नये. पंतप्रधान मोदी पिंपळगावच्या सभेत कांद्याचा भाव व धोरणांवर शब्दही का बोलले नाही. यातच त्यांचे अपयश दडलेले असल्याचे भुजबळ म्हणाले.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारासाठी शनीपटांगणात आयोजित सभेत भुजबळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे,उमेदवार महाले,बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे,जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर देशमुख, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई,जेष्ठ नेते तात्या लहरे,जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर,महेंद्र काले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, की मोदी पिंपळगावच्या सभेत नाशिकच्या सप्तरंगांत कौतुक करत होते. पण या सप्तरंगांसाठी मोदींनी काय केले ते जाहीरपणे सांगावे. या सर्व ठिकाणी मी कोट्यावधींची काम केले असून, यामुळे ही ठिकाणं नव्या रुपात आज दिसत असल्याचे भुजबळ यांनी येथे केलेल्या कामाची यादी सांगत स्पष्ट केले. मोदींनी पिंपळगावच्या सभेत नाशिकचे मुख्य पीक असलेल्या कांद्याच्या धोरणावर व भावावर बोलण्याचे का टाळले असा सवाल करत मागील वेळी शेतमालाला दीडपट भाव देऊ असे म्हटलेले मोदी या वेळेस मात्र शेतीच्या प्रश्नावर का बोलत नाहीत. 

वास्तविक मते मागताना आश्वासन मूर्ती जनतेपुढे मांडावी लागते व काय करणार हे सांगावे लागते. परंतु यांच्याकडे असा कुठलाही मुद्दा नसल्याने भावनिक राजकारण करून मोदी आणि सहकारी मते मागत जनतेला पुन्हा एकदा फसवायला निघाले, असे भुजबळ म्हणाले. यावेळी भुजबळांनी भाजप व शिवसेनेच्या सरकारच्या बोलघेवडेपणाचा आणि भाषणांचा जोरदार समाचार घेतला. दिंडोरीच्या विकासासाठी आणि शरद पवारांची ताकद वाढवण्यासाठी मागील वेळेप्रमाणे चूक न करता यावेळी राष्ट्रवादीचाच खासदार दिल्लीत पाठवा, असे आवाहनही भुजबळ यांनी केले.

मोदी सरकारच्या काळात जिल्ह्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकऱ्यांची जाण असलेले नेतृत्व दिल्लीत असायला हवे हा विचार करून राष्ट्रवादीचाच खासदार दिल्लीत पाठवा असे आवाहन प्रदेश चिटणीस माणिकराव शिंदे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी केले. यावेळी उषाताई शिंदे,प्रा.ज्ञानेश्वर दराडे,संजय बनकर,भागवतराव सोनवणे,मोहन शेलार,नानासाहेब शिंदे,सचिन सोनवणे,एकनाथ गायकवाड,एजाज शेख,विठ्ठल कांगणे आदींनी मनोगत व्यक्त केले.

सभेला राधाकिसन सोनवणे,किसनराव धनगे,हरीभाऊ जगताप,शहराध्यक्ष दीपक लोणारी,नगरसेवक डॉ.संकेत शिंदे,
प्रवीण बनकर,निसार लिंबूवाले,प्रशांत शिंदे,सलीम शेख,सुभाष गांगुर्डे,संतू पाटील झांबरे,बाळासाहेब गुंड,नवनाथ काळे,अशोक मेंगाने,देविदास शेळके,गणपत कांदळकर, सोनाली कोटमे,निर्मला थोरात,श्रावण देवरे,महेंद्र पगारे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Fadnavis should give answer about water issue says Chhagan Bhujbal