Loksabha 2019 : काँग्रेस म्हणजे 'कन्फ्यूजन'चे दुसरे नाव : पंतप्रधान

Friday, 26 April 2019

- 2014 च्या तुलनेने मध्यमवर्गीयांच्या खिशात आता अधिक पैसे शिल्लक राहत आहेत

मुंबई : काँग्रेस आता सर्वांत कमी जागा लढवित आहे. यापूर्वी 2014 मध्ये सर्वांत कमी जागा जिंकण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे. तर आता सर्वांत कमी जागा लढविण्याचा आहे. त्यामुळे काँग्रेस आता 'कन्फ्यूजन'चे दुसरे नाव बनले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. 

वांद्रा-कुर्ला येथे आयोजित महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी बोलत आहेत. ते म्हणाले, माझ्या एका आवाहनानंतर अनेकांना गॅस अनुदान सोडले. मध्यमवर्गीयांच्या योगदानामुळे हे सर्व काही साध्य होऊ शकले आहे. तसेच 40 लाख नागरिकांनी रेल्वेचे अनुदान सोडले. 'आयुष्यमान भारत' ही योजना देशासाठी एक आधार ठरली आहे. मागील पाच वर्षांत आपण अनुभव घेतला असेल, की भ्रष्टाचाराची एक बातमीही तुम्ही वाचली नसेल.

तसेच 2014 नंतर गैरव्यवहार करणाऱ्या अनेकांना मी तुरुंगाजवळ नेले. आता 2019 मध्ये पुन्हा संधी द्या, त्यांना आतमध्ये टाकेन. याशिवाय 2014 च्या तुलनेने मध्यमवर्गीयांच्या खिशात आता अधिक पैसे शिल्लक राहत आहेत, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress is another name of Confusion says PM Modi