Loksabha 2019 : सुजय विखेंचा अर्ज भरण्यासाठी खासदार गांधींची हजेरी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

नगर - भारतीय जनता पक्ष व महायुतीर्फे नगर लोकसभा मतदारसंघातून आज सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानसभेचे उपसभापती विजय औटी, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, राज्यमंत्री महादेव जानकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी हजेरी लावली. विशेष म्हणजे भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हे देखील यावेळी उपस्थित होते. 

डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी घोषित झाल्यापासून विद्यमान खासदार गांधी नाराज असल्याचे सांगितले जात होता. त्यामुळे यावेळी गांधींच्या उपस्थितीने सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या. परंतु, गांधी यांनी पक्षाचा प्रचार करणार असल्याचे आधीच घोषित केले आहे. मात्र, त्यांचे चिरंजीव सुवेंद्र नगरमधून उमेदवारी करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे गांधी यांची हजेरी आज महत्वाची मानली जाते. 
पालकमंत्री राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले व मोनिका राजळे, माजी आमदार बबनराव पाचपुते व अनिल राठोड, डॉ. विखे त्यांच्या पत्नी धनश्री यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विखे यांनी नगरमधील न्यू आर्टस महाविद्यालयपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली होती. त्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्ष्यणीय होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dilip Gandhi present to fill the form of Sujay Vikhe