कारणराजकारण : 'पालक'मंत्री असूनही पुणेकर 'अनाथ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

पुणे : ''पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुण्याचे पालकत्व घेतले असले तरी, पुणेकरांकडे मात्र त्यांचे लक्ष नसल्याची खंत पर्वती विधानसभा मतदारसंघातील जनता वसाहतमधील नागरिकांनी मांडली.  

पुणे : ''पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुण्याचे पालकत्व घेतले असले तरी, पुणेकरांकडे मात्र त्यांचे लक्ष नसल्याची खंत पर्वती विधानसभा मतदारसंघातील जनता वसाहतमधील नागरिकांनी मांडली.  

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर #कारणराजकारण - भाग दोन ही मालिका फेसबुक लाईव्हच्या माध्यामातून सुरु आहे. या मालिकेच्या दरम्यान जनता वसाहत परिसरातील नागरिकांशी आपण संवाद साधला.

''उर्जा योजनेंतर्गत धुरमुक्त करण्याची योजनाही धुळखात असून सबसिडी जमा होत नसल्याचेही स्थानिकांनी सांगितले. येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, अंगणवाडी सेविकांना न मिळालेले वाढीव मानधन,अशा अनेक समस्या येथे असून, सरकारने जाहीरनाम्यात याची दखलही घेतली नाही. यामुळे काही नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालत असल्याचे सांगितले तर, काहींनी मतदानाचा हक्क बजावून आम्ही योग्य उमेदवार आणणार असल्याचे सागंगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion with citizens at Janata Wasahat (Pune)