कारणराजकारण : खोलीतले कुटुंबच वाढले पण...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

पुणे  : ''मुले मोठी झाली, घरात नातवंडेही आली. कुटुंब वाढले. पण त्यांना सामावून घेणारी 10 बाय 10 ची खोली तेवढीच राहिली. मग सांगा आम्ही राहायचे कसे? '' असा प्रश्न कसब्यातील नातू वाड्यातल्या आजीबाईंनी 'सकाळ' च्या करणराजकारण या फेसकबुक लाईव्ह मध्ये मांडला.

पालकमंत्री काही फुटांवर असूनही कसब्यातील रहिवाशांची सुरक्षा पणाला लागली आहे. 100 वर्षांपेक्षाही जुन्या वाड्यांमध्ये लोक राहत आहेत. या भागात शनिवारवाडा ही ऐतिहासिक वास्तू असल्यानेे बांधकामासाठी मर्यादा आहेत. त्यामुळे इथल्या रहिवाशांचे जगणे अवघड झाल्याचे दिसून आले. याबरोबरच महिलांसाठी स्वच्छतागृहे तसेच दुरावस्थेसाठी भांडावे लागते  असल्याची खंत येथील रहिवाशांनी व्यक्त केली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion with residents of Wada in Kasaba Peth