कारणराजकारण : सांगा आम्ही जगायचं कसं? शास्त्रीनगरमधील नागरिक संतप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

रस्त्यावर कचरा, वस्तीत ड्रेनेज फुटलेल्या आहेत, त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. पाणी व्यवस्थित येत नाही, सरकारच्या योजनांचा लाभ मिळालेला नाही. अशा परिस्थितीत जगायचे कसे असा संतप्त सवाल शास्त्रीनगरमधील नागरिक करत आहेत. ​

शास्त्रीनगर (पुणे) : रस्त्यावर कचरा, वस्तीत ड्रेनेज फुटलेल्या आहेत, त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. पाणी व्यवस्थित येत नाही, सरकारच्या योजनांचा लाभ मिळालेला नाही. अशा परिस्थितीत जगायचे कसे असा संतप्त सवाल शास्त्रीनगरमधील नागरिक करत आहेत. 

कारणराजकारण मालिकेत कोथरूड विधानसभा मतदारसंघात शास्त्रीनगर भागातील नागरिकांशी संवाद साधला. केंद्र शासनाची उज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना याच्या जाहिराती पहातो, पण या योजना आमच्या पर्यंत आलेल्या नाहीत.  कोथरूड मध्ये वाहतूकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. चांदणी चौकातील प्रश्न सुटला नाही,  अपघात होऊन नागरिकांचा म्रुत्यू झालेला आहे. मेट्रोच्या कामामुळे  वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. दुसऱ्या चाळीत पाणी येते पण आमच्याकडे येत नाहीत,  कचरा उचलला जात नाही. ड्रेनेज फुटले आम्ही पैसे खर्च करून ते दुरूस्त करतो, पण महापालिकेचे लोक येत नाहीत.  स्थानिक नगरसेवकांकडे अनेकदा तक्रारी करून देखील ते आमच्याकडे लक्ष देत नाहीत. 

बाहेरचे  लोक पुण्यात येत आहेत, शिकलेल्या मुलांना रोजगार नाहीत. विद्यार्थांसाठी संकुल झाले पाहिजे. मोदी सरकारकडून आम्हाला अपेक्षा होत्या,  पण काहीही फायदा झाला नाही. कोथरूड मध्ये गुन्हेगारी वाढली आहे, महिला सुरक्षा, गाड्यांची जाळपोळ, तोडफोड होते. पण पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नाही अशी टीका नागरिकांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion with shastrinagar citizens in karanrajkaran series