कारणराजकारण : मंडईला घ्यायचाय मोकळा श्वास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

पुणे : ताजी भाजी खरेदी करण्यासोबतच सणासुदीला मंडईत यावे लागते, मात्र, बसथांब्यावर उतरताच रस्त्यालगतची दुकाने आणि वाहनांच्या रांगामधून वाट काढावी लागते. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचा आग्रह मंडईत खरेदीसाठी आलेल्या महिलांचा आहे. 

सकाळच्या 'कारणराजकारण' दरम्यान येथील व्यावसायिकांच्या पुर्नवसनाची योजना रखडली ती मार्गी लावावी, अशी मागणी व्यावसायिकांनी केली. या उपाययोजना झाल्या खऱ्याअर्थाने महात्मा फुले मंडई मोकळा श्‍वास घेण्याची शक्‍यता आहे. 

मंडईतील टिळक पुतळ्या मागील बाजूपासून रस्त्याच्या दोन्ही बाजुंना छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. शिवाय, सणासुदीच्या काळात हातगाडी, फेरीवाले आणि पथारी व्यावसायिक दुकाने मांडतात. येथे खरेदीसाठी येणारे लोकही वाहने घेऊनच मंडईत येतात. त्यामुळे या मंडईच्या चारही बाजुंनी वाहतूक कोंडी दिसून येते. विशेषत: सकाळी आणि सायंकाळी खरेदीसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मुख्यत: महिलांची गैरसोय होते. त्यात, या परिसरात दोन वाहनतळ असल्याने त्यांच्या प्रवेशद्वारात हमखास वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. याचाही फटका पादचाऱ्यांना बसतो. त्यामुळे खरेदी कशी करायची, असा प्रश्‍न महिलांचा आहे.

Web Title: Discussion with traders in Mahatma Phule Mandai