Loksabha 2019 : नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था खिळखिळी : आंबेडकर

वृत्तसंस्था
रविवार, 21 एप्रिल 2019

"इथल्या मच्छीमार (कोळी) बांधवांना पारंपरिक व्यवसाय टिकवायचा असेल, तर बहिष्काराचे हत्यार हे चुकीचे असून, सर्व कोळी बांधवांनी बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार जोशी यांना साथ द्यावी.'' 

- अॅड. आंबेडकर

कुडाळ : नोटाबंदी करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्था खिळखिळी केली आहे. आपले अमूल्य मत विकू नका. योग्य उमेदवाराला मतदान करा. इथल्या मच्छीमार बांधवांना पारंपरिक व्यवसाय टिकवायचा असेल, तर बहिष्काराचे हत्यार हे चुकीचे असून, संपूर्ण मच्छीमार बांधवांनी बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार मारुती जोशी यांना साथ द्यावी, असे प्रतिपादन ऍड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी कुडाळ येथील जाहीर सभेत केले.

वंचित बहुजन आघाडीची सभा येथे सिद्धिविनायक हॉलसमोरील मैदानात पार पडली. आंबेडकर म्हणाले, ""डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला आहे; पण हा अधिकार अनेक जणांनी अनेक पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न चालू आहे. माझे मत मी विकणार नाही. विकास पाहिजे, बेरोजगारी हटवायची असेल, शिक्षण ही शासनाची जबाबदारी करायची असेल, तर शासनसुद्धा तेवढेच जबाबदार पाहिजे. पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय का घेतला, कशामुळे घेतला, काय कारण होते? यामुळे इथली पूर्ण अर्थव्यवस्था बिघडली आहे. व्यापार थांबला, अनेक कारखाने बंद झाले, बेरोजगारी वाढली आहे.'' 

ते म्हणाले, "इथल्या मच्छीमार (कोळी) बांधवांना पारंपरिक व्यवसाय टिकवायचा असेल, तर बहिष्काराचे हत्यार हे चुकीचे असून, सर्व कोळी बांधवांनी बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार जोशी यांना साथ द्यावी.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to Demonetization Financial System have Collapsed