Loksabha 2019 : मोदींना आयोगाचा दणका; आता कुठेच नाही 'झळकणार'!

वृत्तसंस्था
शनिवार, 20 एप्रिल 2019

- निवडणूक आयोगाने केली ही कारवाई

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील 'जर्नी ऑफ कॉमन मॅन' ही वेब सीरिजच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. या वेब सीरिजवर केंद्रीय निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. त्यामुळे ऐननिवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

पंतप्रधान मोदी यांच्यावरील या वेब सीरिजचे 10 एपिसोड करण्यात आले आहेत. मात्र, आता त्यांच्या या वेब सीरिजवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. 'ईरॉस नाऊ'च्या सौजन्याने या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे. ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांच्यावरील या वेब सीरिजमध्ये मोदींच्या बालपणापासून ते पंतप्रधान बनण्यापर्यंतचा प्रवास रेखाटण्यात आला आहे. 

दरम्यान, यापूर्वीही नरेंद्र मोदी यांच्या जीवनपटावर आधारित बायोपिक 'पीएम नरेंद्र मोदी' तसेच नमो टीव्हीच्या प्रदर्शनावर स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर आता ही कारवाई केली गेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Commission bans web series on PM Narendra Modi