Loksabha 2019 : सनी देओलविरोधात निवडणूक आयोगाकडून नोटीस जारी

वृत्तसंस्था
शनिवार, 18 मे 2019

- आचारसंहितेचे उल्लंघनप्रकरणी  सनी देओलला नोटीस.

नवी दिल्ली : अभिनेता सनी देओल यांना आचारसंहिता उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही सनी देओलकडून प्रचार केला गेला. या आरोपावरून देओल यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

सनी देओल यांना ऐन निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. त्यानंतर त्यांना पंजाबच्या गुरदापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. आता त्यांचा सामना काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांच्याशी होणार आहे. सनी देओल यांना आचारसंहितेचे उल्लंघन प्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

त्याबाबत निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की सनी देओल यांनी शुक्रवारी पाच वाजता निवडणूक प्रचार कालावधी संपल्यानंतर एका जाहीरसभेत भाषण केले. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली. या भाषणात त्यांनी मायक्रोफोनचा वापर केला होता.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Commission issued Notice against Sunny Deol