ElectionTracker : नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राहुल गांधी काय म्हणाले आज?

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 15 मार्च 2019

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! 
हा आहे 15 मार्च 2019 चा #ElectionTracker

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! 
हा आहे 15 मार्च 2019 चा #ElectionTracker

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईतील पादचारी पूल कोसळून झालेल्या अपघातामुळे मला तीव्र दुःख झाले आहे. मी मृतांच्या कुटूंबियांचे सांत्वन करतो. जखमी झालेले नागरिक लवकरच बरे होतील अशी मी आशा करतो. महाराष्ट्र सरकार लागेल ती सर्व मदत अपघातग्रस्तांना करेल.
- ट्विरवर 

हा नवीन भारत आहे, इथे व्यक्तिची घराणेशाही न बघता कामगिरी बघितली जाते. जे लोक काम करू इच्छितात त्यांच्यामध्ये घराणेशाही राजकारण कधीच अडथळा म्हणून येणार नाही. आता देशातल्या 130 कोटी जनतेसाठी संधी व दारं उघडी आहेत. 
- ट्विटर

अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

'फिर एक बार मोदी सरकार' या संकल्पानुसार 'भाजप-अपना दल' युती करून उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणूक सोबत लढविणार आहे. अपना दल राज्यातील दोन जागांवर निवडणूक लढविणार आहे. यामध्ये अनुप्रिया पटेल या मिर्झापूर मतदारसंघातून लढणार आहेत. तसेच दुसऱ्या जागेवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक होणार असून, त्यानंतर चर्चा होणार आहे.

राहुल गांधी, अध्यक्ष, काँग्रेस

काल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या टॉम वडक्कन यांच्याबाबत बोलताना राहुल गांधी छत्तीसगड येथे म्हणाले, 'वडक्कन यांच्या भाजपमध्ये जाण्याने काँग्रेसला कोणताही झटका लागलेला नाही. वडक्कन कुणी मोठे नेता नव्हते.'

अमरावती येथे शिवसेना-भाजप युतीचा महामेळाव्यातून 
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

'सध्या कोणावर टीका करायची म्हणजे पंचायत होते. आता कोणत्यातरी पक्षात असला आणि नंतर शिवसेना किंवा भाजपमध्ये असायचा. त्यामुळे आता माझी एकच विनंती आहे, की आता शरद पवारांना भाजपमध्ये घेऊ नका''

योगी अदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश ट्विटरवरून

विंध्य पर्वताची शक्ती, गंगा नदीची सत्यता, राम, कृष्ण, शिव यांचे आशीर्वाद, गोरखनाथचा जिद्दीपणा, अवधचा तरुणपणा, उत्तर प्रदेशला जगभरात गौरवण्यात आले होते. ही उत्तरप्रेदशची हरवलेली ओळख परत मिळत आहे. उत्तरप्रदेशचा चेहरा बदलत आहे. आता हे परिवर्तन थांबणार नाही. उत्तर प्रदेशची ही नवी सुरवात आहे. 

चंद्राबाबू नायडू, तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष (ट्विटर)

''हे तेलुगू देसम पक्षाचे सरकार असून, ते प्रत्येक पावलावर जनतेसोबत आहे. आमच्या सरकारकडून शिक्षण, औषध आणि पोषक अन्न हजारो महिलांसाठी देण्यात येत आहे''.  

अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री (ट्विटर)

पोलिसांनी कोणत्याही सर्च वॉरंटशिवाय छापेमारीची कारवाई केली. हे काय चालले आहे? ही कसली कारवाई आहे? तसेच पोलिस आणखी एका कॉल सेंटरवर पोहचले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सर्व्हरची माहिती आणि आमचा डाटा मागितला जात आहे.

मायावती, सर्वेसर्वा, बहुजन समाज पक्ष 

बहुचर्चित राफेल विमान व्यवहारात स्वत:चा बचाव करण्यासाठी संसद आणि न्यायलयात मोदी ज्याप्रकारे आपले रंग बंदलत आहेत त्याने वारंवार त्यांचीच फजिती होत आहे. बोफोर्सप्रमाणेच राफेलही अत्यंत गंभीर भ्रष्टाचाराचे प्रतिक बनत चालले आहे. कोणतेही सरकार देशहिताच्या बाबतीत एवढे निष्काळजी कसे असू शकते?

शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

'सर्वोच्च न्यायालयात व्हीव्हीपॅटमधील मतं मोजण्याच्या मागणीसाठी काल विरोधी पक्षांनी याचिका दाखल केली आहे. व्हीव्हीपॅट मशीन मध्ये 2 टक्के मतांची मोजणी केली जाते पण आमची मागणी 50 टक्के मतांची मोजणी केली जावी अशी होती.' 'माझे सर्व पक्षांना आवाहन आहे सगळ्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा आणि अर्जच भरू नये किंवा निवडणूक आयोगाने ही निवडणूक रद्द केली नाही तर सर्व पक्षांनी मिळून एकाच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीला ही उमेदवारी द्यावी.'​

अखिलेश यादव, माजी मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशात महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत राज्यातील भाजप सरकार दुर्लक्ष करत आहे. दररोज सामूहिक बलात्काराच्या घटना घडत आहेत. मात्र, याचे दु:ख आहे, की व्हॉट्सअॅप विश्वविद्यालयातील लोक द्वेष पसरवत आहेत. तसेच अत्याचार करणाऱ्यांविरोधात त्वरित आणि कडक कायदेशीर कारवाई करावी, याची मागणी मी करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Tracker Today Quotes Of Narendra Modi Amit Shah and Rahul Gandhi