ElectionTracker : आज काय म्हणाले, देशातील महत्त्वाचे राजकीय नेते?

ElectionTracker : आज काय म्हणाले, देशातील महत्त्वाचे राजकीय नेते?

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ..प्रत्येक पक्षाचा नेता रोज काही ना काही बोलणारच..या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्या लक्षात रहात नाही. याचसाठी हा प्रपंच! हा आहे 7 एप्रिल 2019 चा #ElectionTracker

पंतप्रधान नरेंद्र मोदी
तृणमूल काँग्रेस व ममता बॅनर्जी का उद्विग्न होतात? 
- जेव्हा लष्कर दहशतवादाला सडेतोड उत्तर देते. 
- जेव्हा भारत आंतरिक्ष शक्ती बनतो. 
-  शेतकऱ्यांना उपजीविकेचे साधन मिळते. 
- गरिबांना विमा मिळतो. 
ममता बॅनर्जी अशांना का पाठिंबा देतात ज्यांना 2 पंतप्रधान हवे आहेत.?
(प. बंगालामधील सभेत बोलताना मोदी)

ममता बॅनर्जी
आज जागतिक आरोग्य दिन आहे. आम्ही बंगालमधील नागरिकांसाठी 'Health for All' ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील सर्व सरकारी दवाखान्यात आरोग्य तपासणी मोफत आहे. आम्ही 43 नवीन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल तयार केली आहेत. नुकतेच आम्ही 'स्वास्थ्य साथी' आरोग्य विमा कार्ड दिली आहेत. या कार्डचा 7.5 कोटी नागरिकांना लाभ होईल.

योगी आदित्यनाथ
आंध्र आणि तेलंगणमधील प्रादेशिक पक्षांनी घराणेशाही राबवून राज्यांचा विकास खोळंबून ठेवला आहे. ते जनतेच्या भावनांशी खेळले आहेत. त्यांच्या या राजकारणामुळे सामान्यांचे मात्र हाल झाले आहेत.

अमित शहा, बरगाह, ओडिशा. (जाहीरसभा)
ओडिशात बदलाची वेळ आली आहे. आता ओडिशातील जनता थोडाही विलंब सहन करू शकत नाही. त्यामुळे आता सर्वांनी मिळून राज्यातील भ्रष्ट आणि अकार्यक्षम बिजू जनता दलाचे सरकार हद्दपार करण्याची प्रतिज्ञा करू.

चंद्राबाबू नायडू, मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी, के. चंद्रशेखर राव आणि जगन मोहन रेड्डी हे सर्व एकच आहेत. मात्र, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, याची मला शंभर टक्के खात्री आहे.

शरद पवार
केडगाव : 'देशात कोणाला प्रसिद्धी मिळवायची असेल तर त्यांना बारामतीच्या पवार कुटुबियांवर टीका करावी लागते,' असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (रविवार) केले. तसेच 'वर्ध्याची सभा आणि पवार कुटुंबीय यांचा काहीही संबंध नव्हता. तेथे ना बारामतीचे लोक होते ना पुण्याचे. बारामतीवर जे बोलले जाते ते देशात चालते,' असेही ते म्हणाले. 
पाटस : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी व माझे संबंध चांगले आहेत. पण निवडणूक आली की त्यांच्या अंगात येते. असे दिसून येत आहे,' अशी टिका शरद पवार यांनी केली.

राहुल गांधी
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा काही भाग ट्विट करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'मिस्टर मोदी तुम्ही कितीही पळ काढला तरी लपू शकत नाही. तुम्ही जे केलंय ते तुमचा पिच्छा करत राहील. तुमच्या आवाजातूनच जे तुम्ही लपवताय ते देशाला कळू शकतं. खरं हे खूप शक्तीशाली असतं. मी तुम्हाला आव्हान करतो की भ्रष्ट्राचारावर तुम्ही वादविवाद करुन दाखवा.'

अखिलेश यादव 
निवडणुकांपुर्वी हे सगळे चौकीदार झाले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक चौकीदाराची चौकी काढून घेण्याचे काम आम्ही यंदाच्या निवडणुकीत करणार आहोत. सध्या द्वेष पसरवणारे नेते आले असून, त्यांच्याकडून तिरस्कार पसरविण्याशिवाय काहीच केले जात नाही. त्यामुळे यंदाची निवडणूक इतिहास घडवू शकते. हा इतिहास लिहिण्याची संधी आपल्याकडे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com