ElectionTracker : नरेंद्र मोदी, शरद पवार आणि राहुल गांधी काय म्हणाले आज?

Wednesday, 13 March 2019

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! 
हा आहे 13 मार्च 2019 चा #ElectionTracker

निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! 
हा आहे 13 मार्च 2019 चा #ElectionTracker

पंतप्रधान नरेंद्र मोदी 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज (ता. 13) सकाळी मतदाराला जागे करण्यासाठी एक ब्लॉग ट्विटरवर शेअर केला आहे. या ब्लॉगमध्ये मोदी यांनी लोकांना मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासण्याचे आवाहन केले आहे. देशाच्या विकासासाठी आपले एक-एक मत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच मतदानाचा हक्क बजावण्यासाठीही जनेतेला त्यांनी आवाहन केले आहे. यासोबतच त्यांनी ट्विटरवर दिग्गज मान्यवर, प्रमुख राजकारणी, मुख्यमंत्री, खेळाडू, कलाकार, पत्रकार, संगीतकार, अध्यात्मिक गुरू यांनाही मतदानाबाबत जागरूकता करण्यासाठी आवाहन केले आहे.

राहुल गांधी 
चेन्नईत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्टेला मैरिस कॉलेज मधील विद्यार्थ्यांची आज (बुधवार, ता. 13) मने जिकंली. जिन्स-टी शर्ट मध्ये आलेले ‘राहुल’ यांनी खूप कुल अंदाजात विद्यार्थिनींच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. ते म्हणाले, ‘मला वाटत नाही की कोणत्याही बाबतीत महिला ही पुरुषांपेक्षा दुय्यम नाही. महिलांनी प्रत्येकच गोष्टीत पुरुषांसोबत समान पातळीवर असले पाहिजे. मोठमोठ्या कंपन्या, लोकसभा, विधानसभा, सरकारी-खासगी सेक्टर्स इथे कुठेच स्त्रियांची पुरेशी लिडरशीप बघायला मिळत नाही. त्यामुळेच आम्ही असे ठरवले आहे की संसद आणि सगळ्याच सरकारी नोकरीत महिलांना 33 टक्के जागा आरक्षित ठेवण्यासाठी प्रस्ताव मंजूर करण्याचा प्रयत्न करू. महिला सबलीकरण जर भारतात पाहिजे असेल तर आधी महिलांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल व्हायला पाहिजे. आपणही महिलांना प्रतिनिधित्व करण्यास आग्रह धरला पाहिजे. मला वाटतं की महिला या पुरुषांपेक्षा हुशारच असतात.’

शरद पवार

नगर : येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सीद्वारे आज (बुधवार, ता. 13) दुपारी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अनेक कार्यकर्ते आणि बूथ प्रमुखांनी आपले मुद्दे व प्रश्न पवार यांच्यासमोर मांडले. पवार म्हणाले, ‘मोदी सरकार म्हणजे प्रसिद्धीचं सरकार आहे. इंदिरा गांधी यांच्या काळातही पाकिस्तानला त्यांनी अनेक बाबतीत उत्तरं दिलीत पण त्याचं भांडवल केलं नाही. आज आपल्या लष्कराच्या कर्तृत्त्वाचं राजकारण मात्र भाजप सरकार करतंय. मनमोहनसिंग सरकार असताना राफेल व्यवहाराची किंमत 350 कोटी कंपनीने सांगितली होती. मात्र भाजप सरकारने ही किंमत 650 कोटी एवढी सांगितली. म्हणजे भाजपने मूळ किमतीच्या दुप्पट व्यवहार केला!’

‘भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी, धनगर समाजाचा प्रश्न निवडून आल्यावर एकाच आठवड्यात सोडवू, असे जाहीर सांगितले होते. मात्र हा प्रश्न अद्यापही भिजत पडला आहे. शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा खुद्द पंतप्रधानांनी केली. जलपूजनही केले. मात्र काम केले नाही. महाराजांच्या बाबतीत अशी स्थिती तर सर्वसामान्यांचे काय?’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Tracker today s quotes of Narendra Modi Sharad Pawar Rahul Gandhi