Loksabha 2019 : खडकवासला मतदारसंघात मशीनमध्ये बिघाड

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 23 एप्रिल 2019

खडकवासला : बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदार संघातील काही मतदान केंद्रावरील एव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

खडकवासला : बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदार संघातील काही मतदान केंद्रावरील एव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तेथे नवीन मशीन बसविणे चे काम सुरू आहे. अशी माहिती हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी सांगितले. सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे 20 टक्के, दुपारी एक वाजेपर्यंत 30 टक्के मतदान झाले आहे. असे ही कोळी यांनी सांगितले

दरम्यान, अनेक मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावून मतदान केले. सकाळ पासून मतदान केंद्रावर गर्दी आहे. बारामतीत राष्ट्रवादी काँगेस आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे व भाजपा शिवसेना महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्यात मुख्य लढत आहे..

बारामती मतदार संघातील खडकवासला मतदार संघात चार लक्ष 75 हजार मतदान आहे. तसेच हे शहरी भागातील मतदार असल्याने हे मतदान नक्की कोणाला जास्त मिळणार याची मोठी चर्चा सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EVM Machine breaks down in khadkwasla