ModiWithSakal : आमचा जाहीरनामा हा देश चालविणाऱ्यांचा : मोदी (पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मे 2019

मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत.

पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

ModiWithSakal : आता अजेंडा स्वप्नपूर्तीचा! (पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत)

लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची विशेष मुलाखत. या मुलाखतीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी दिलखुलास शैलीत आपली मते मांडली. गेल्या पाच वर्षांत लोकांच्या गरजा पूर्ण केल्या. पुढच्या पाच वर्षांसाठी अजेंडा आहे, तो लोकांच्या आकांक्षापूर्तीचा, यावर पंतप्रधानांनी भर दिला. 

प्रश्‍न : भाजपने निवडणूक जाहीरनामा किंवा संकल्पपत्र लोकांसमोर ठेवलं आहे. काँग्रेसनेही जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तुमच्या जाहीरनाम्यातील सर्वाधिक प्राधान्याच्या अशा कोणत्या तीन बाबी आहेत, ज्या पुढच्या पाच वर्षांत तुम्ही पूर्ण करालच असे सांगू शकता?

उत्तर : दोन्ही जाहीरनामे पाहा. फरक तुमच्या लक्षात येईल. एक जाहीरनामा आहे देश चालवणाऱ्यांचा (भाजपचा) म्हणून जबाबदारीनं मांडलेला आहे. दुसरा (काँग्रेसचा) निवडणुकीत टिकून राहण्यासाठीचा, जनतेला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करणारा जाहीरनामा आहे. यात मोठं अंतर आहे. दुसरा महत्त्वाचा फरक आहे. राष्ट्रहिताच्या मुद्यावरील भूमिका. काँग्रेसनं प्रत्येक बाबतीत तडजोडी केल्या. मग काश्‍मीरचा प्रश्‍न असेल, देशद्रोहाविषयीचा कायदा असेल, प्रत्येक ठिकाणी तडजोडी केल्याचं दिसेल. भाजपनं याविषयी कणखर भूमिका घेतली आहे. आम्ही नागरिकत्व कायद्यात सुधारणा करणारं विधेयक आणलं. पाकिस्तान, बांगलादेशामधून अनेकांना जबरदस्तीनं पळवून लावण्यात आलं. यात शीख आहेत, ख्रिश्‍चन आहेत, बौद्ध आहेत, जैन, हिंदू आहेत. या सर्वांना स्वीकारलं पाहिजे असं मी हिमतीनं सांगतो आहे. ३५ए कलम संपवायचं काम काँग्रेस करू शकत नाही. २०१४ ते २०१९ या काळात सामान्यांच्या गरजा पूर्ण करण्याचं काम मी केलं. स्वातंत्र्यापासून सत्तर वर्षांत न झालेलं हे काम आहे. अनेक कमतरता होत्या, खड्डे भरायचे होते. पुढच्या पाच वर्षांसाठी माझ्या मनात स्पष्ट अजेंडा आहे, तो लोकांच्या आकांक्षापूर्तीचा. प्राथमिक गरजा भागविल्यानंतर आता लोकांची स्वप्न साकारण्यासाठी काम करू. देशातील विकासात मागे पडलेले १५० आकांक्षा जिल्हे आम्ही शोधले. यातील काही जिल्ह्यांत एकही हॉस्पिटल नाही. त्यांना इतर जिल्ह्यांच्या बरोबरीनं आणायचं आहे. हे झालं तर देशात किती परिवर्तन होईल. तुम्ही तीन प्राधान्यक्रम विचारलेत, यात पहिलं प्राधान्य गरिबांना सशक्त करणं. दुसरं रोजगाराच्या सर्वाधिक संधी तयार करणं आणि तिसरं प्राधान्य महिलांना देशाच्या विकासयात्रेत सहभागी करून घेणं.

पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

ModiWithSakal : आता अजेंडा स्वप्नपूर्तीचा! (पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत)

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

RahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exclusive interview of PM Narendra Modi by Sakal group media MD Abhijeet Pawar