ModiWithSakal : पवार मोदींना भेटले, खास मुलाखत उद्याच्या 'सकाळ'मध्ये

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

सकाळमध्ये मोदींची ही विशेष मुलाखत उद्या (रविवारी) प्रसिद्ध होणार आहे. अभिजित पवार यांनी मोदींची घेतलेली ही मुलाखत सकाळमध्ये वाचायला, सकाळच्या फेसबुक हँडल्सवर आणि साम टीव्हीवर पाहायला विसरू नका.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष मुलाखत सकाळ माध्यम समुहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांनी घेतली आहे. ही मुलाखत उद्या (रविवार) सकाळमध्ये प्रकाशित होत आहे आणि साम वाहिनीवर दाखविली जाणार आहे. केंद्र सरकारच्या अनेक धोरणात्मक बाबींचा उहापोह मोदी यांनी या मुलाखतीत केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरु असताना मराठी मीडियामध्ये मोदी यांनी सर्वप्रथम 'सकाळ'ला मुलाखत दिली आहे. सर्जिकल स्ट्राईक, घराणेशाही, राफेल अशा अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर मोदी यांनी उत्तरे दिली आहेत. 

लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात लढत होत आहे. मोदी विरुद्ध गांधी अशी थेट लढाई होत असताना पुन्हा सरकार येईल का? महाराष्ट्रात एनडीएला किती जागा मिळतील? अलिकडे आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याबद्दल आक्रमक झालेले दिसत आहात? बालाकोट हल्ल्याबाबत आपल्याला काय वाटते? यासह अनेक प्रश्नांची उत्तरे मोदींनी या मुलाखतीत दिली आहेत.

सकाळमध्ये मोदींची ही विशेष मुलाखत उद्या (रविवारी) प्रसिद्ध होणार आहे. अभिजित पवार यांनी मोदींची घेतलेली ही मुलाखत सकाळमध्ये वाचायला, सकाळच्या फेसबुक अकाउंटवर आणि साम टीव्हीवर रविवारी पाहायला विसरू नका.

#ModiWithSakal हा हॅशटॅग वापरून या मुलाखतीविषयी ट्विट करा.
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exclusive interview of PM Narendra Modi taken by Sakal Media Group MD Abhijeet Pawar