Loksabha 2019 : बारामती-दौंडमध्ये मतदानाची चुरस

मिलिंद संगई
Tuesday, 23 April 2019

उमेदवारांचे मतदारसंघ असलेल्या बारामती व दौंडमध्ये सकाळी पहिल्या टप्प्यात मतदानात उत्साह दिसून आला. लोकसभा मतदारसंघातील उर्वरित मतदारसंघापेक्षाही बारामती व दौंडमध्ये मतदानाची चुरस सुरु असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले. 

बारामती : उमेदवारांचे मतदारसंघ असलेल्या बारामती व दौंडमध्ये सकाळी पहिल्या टप्प्यात मतदानात उत्साह दिसून आला. लोकसभा मतदारसंघातील उर्वरित मतदारसंघापेक्षाही बारामती व दौंडमध्ये मतदानाची चुरस सुरु असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले. 

सकाळी पहिल्या टप्प्यात अकरा वाजेपर्यंत दौंडमध्ये 23.89 तर बारामतीत 23.50 टक्के मतदान झाल्याचे आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आली होती. या पाठोपाठ खडकवासल्यामध्ये 18.50 टक्के मतदानाची नोंद झाली. शहरी भाग असूनही चांगले मतदान होईल, असा अंदाज खडकवासल्याबाबतीत राजकीय पक्षांकडून व्यक्त केला जात आहे. 

दरम्यान सुप्रिया सुळे बारामती तर कांचन कुल दौंडच्या उमेदवार असल्याने या दोन्ही विधानसभा मतदारसंघात मतदानाचा जोर असाच कायम राहिल असा अंदाज व्यक्त होतो आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fight between Baramati and daund for Loksabha elections