Loksabha 2019 : पुण्यातील लढत मैत्रीपूर्ण होईल : गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

'मी व मोहन जोशी पहिल्यापासून मित्र आहोत. राजकीय जीवनात मी कोणावरही टीका करत नाही. त्यामुळे पुण्यातील ही लढत मैत्रीपूर्ण लढत होईल.

- गिरीश बापट

पुणे : 'मी व मोहन जोशी पहिल्यापासून मित्र आहोत. राजकीय जीवनात मी कोणावरही टीका करत नाही. त्यामुळे पुण्यातील ही लढत मैत्रीपूर्ण लढत होईल,' अशी प्रतिक्रिया भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी दिली. काल (ता. 1) रात्री काँग्रेसचे पुण्यातील उमेदवार म्हणून मोहन जोशी यांच्या नावाची घोषणा झाली. त्यावर प्रतिक्रीया देताना बापटांनी आपले मत व्यक्त केले. 

 

आज (ता. 2) बारामती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल व गिरीश बापट यांनी निवडणूकीसाठी अर्ज भरला. या वेळी पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळेही उपस्थित होते. पुण्याचे ग्रामदैवत व मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे दर्शन घेऊन बापटांनी अर्ज भरला. पुण्यातील वातावरण हे सकारात्मक व चांगले आहे. पुणेकर पुन्हा एकदा युतीच्याच उमेदवाराला निवडून देणार अशी आम्हाला खात्री आहे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.    

अर्ज भरण्यासाठी सुरू झालेल्या या मिरवणुकीत महायुतीच्या घटक पक्षातील सर्व नेते उपस्थितीत होते. तसेच काही दिवसांपूर्वी बंडाचे निशाण उभे केलेले खा. संजय काकडे हे ही या मिरवणूकीत सहभागी झाले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girish Bapat Speaks about fight with Mohan Joshi