Loksabha 2019 : काँग्रेस उमेदवाराला मताधिक्य द्या, नाहीतर मंत्रिपद काढून घेईन; मुख्यमंत्र्यांचा इशारा

वृत्तसंस्था
बुधवार, 24 एप्रिल 2019

- काँग्रेसच्या उमेदवाराला मताधिक्य द्या. तसे झाले नाही तर जाणार मंत्रिपद

- खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिला हा इशारा.

अमृतसर : आपण ज्या भागाचे प्रतिनिधित्व करत आहात, त्या भागातून काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मतदान झाले पाहिजे. मतदान जर कमी झाले तर पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार नाही, असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी सांगितले. तसेच काँग्रेसच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतं द्या. जर तसे झाले नाही तर मंत्रिपद काढून घेतले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर उरलेल्या चार टप्प्यातील मतदान अद्याप झालेले नाही. त्यामुळे आता पुढील टप्प्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. असे असताना आता अमरिंदर सिंह यांनी त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री आणि नेतेमंडळींना कडक शब्दांत इशारा दिला आहे. ते म्हणाले, मतदान जर कमी झाले तर पुढील विधानसभा निवडणुकीत संबंधित व्यक्तीला उमेदवारी मिळणार नाही.  

दरम्यान, अमरिंदरसिंग यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर नेते आणि मंत्र्यांसमोर मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच जर या नेत्यांनी ज्या ठिकाणी त्यांचा प्रभाव आहे. अशा ठिकाणी मताधिक्य मिळाले नाही तर ते नेते मंत्रिपद गमावू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give the leading votes in election otherwise dropped from the cabinet Amrindar Singh warns Congress Leaders